पैल तो गे काऊ कोकताहे अर्थ

पैल तो गे काऊ कोकताहे अर्थ

पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥

संत श्री ज्ञानेश्वर महारांच्या ह्या ओवीचा अर्थ अनेक लोक विचारत आहेत. संपूर्ण ओव्या अशी आहे.

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

इथे माऊली अतिशय प्रेमाने ईश्वराविषयीचे प्रेम व्यक्त करीत आहेत. ज्या प्रमाणे व्याकुळ प्रेमी चातक पक्षाचे उदाहरण देतात त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर कावळा ह्या पक्षाला एखाद्या लहान मुलाप्रमाणे संबोधून आपण भक्तीरसांत किती आकंठ बुडालो आहोत हे सांगत आहेत.

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

जो कावळा इतका कोकलत आहे त्याला पाऊल एक शकुन समाजत आहेत. अरे कावळ्या जा उडून मी तुला सोन्याने मढवीन कि साक्षांत परमेश्वर माझ्या घरी येणार आहे .